
वाळुज महानगर, (ता.30) – वाळूज महानगरात बजाजनगरातील श्री 1008 संभवनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरात दहा दिवसीय पर्युषण पर्वाचा शुभारंभ गुरुवार 28 रोजी भावपूर्ण वातावरणात करण्यात आला. 
या मंदिरात चातुर्मासानिमित्त प.पू. धर्म रक्षिका आर्यिका श्री 105 विपुलमती माताजी, प.पू .आर्यिका रत्न श्री 105 विमुक्तमती माताजी, प. पू. क्षुल्लीका माताजी श्री 105, प. पू. विशालमती माताजी यांचा ससंघ विराजमान आहे. या मंदिरात गुरुवारी सकाळी महावीर कासलीवाल यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी ससंघ या मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र काला, सचिव सुजित गोधा, महावीर पांडे, दिलीप चुडीवाल, अनिल गोधा, सचिन पाटणी, शेखर गंगवाल, सनम पांडे, योगेश कासलीवाल, रवींद्र ठोळे, संदीप बाकलीवाल, सुरभी दिदी आदि उपस्थित होते. धर्म ध्वजारोहण त्यानंतर भगवान संभवनाथांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दशलक्षण विधान, तत्वार्थ सूत्र वाचन व उपदेश, ध्यान, प्रवचन गुरुभक्ती व प्रश्न मंच आदि धार्मिक कार्यक्रमानंतर सुजित व प्रीती गोधा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पर्युषण काळात उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आर्किचन, व ब्रम्हचर्य या विधानावर आधारित माताजींचे प्रवचने होणार असून पर्युषण पर्वाची सांगता 8 सप्टेंबर रोजी होणार आहे. पर्युषण पर्वाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव व भगिनी परिश्रम घेत आहेत.
