
वाळुज महानगर, (ता.27) – भगवान महावीरांनी अवघ्या विश्वाला सत्य व अहिंसा, सम्यक आचार, सम्यक विचार, कुसंगती व रात्रभोजन टाळा, कोणत्याही वस्तूंचा अति संग्रह करू नका. असा दिव्य संदेश बजाजनगर येथे स्वाध्यायी निर्मल छाजेड (अमरावती) यांनी बुधवार 27 ऑगस्ट रोजी पर्युषण पर्वाच्या समारोप प्रसंगी दिला.
वाळूज महानगरातील श्री वर्धमान श्र्वेतांबर जैन स्थानक बजाजनगर येथे 20 ते 27 ऑगस्ट पर्यंत पर्युषण पर्व मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आले होते. हे पर्युषण पर्व अखिल भारतीय स्वाध्याय संघाचे निर्मल पारसमल छाजेड (अमरावती) आणि मनोज भागीरथ पटेरिया (अहिल्यानगर) या दोन स्वाध्यायींच्या मार्गदर्शनाखाली झाले. या स्थानकात समारोप प्रसंगी आलोयना (आलोचना) या पंडित मुनी श्री प्रेमराजजी म.सा. रचित आध्यात्मिक पुस्तकाचे सर्वांनी वाचन केले. तर स्वाध्यायी छाजेड यांनी विश्लेषण केले. त्यानंतर परिक्रमण व सामूहिक क्षमापना होऊन पर्युषण पर्वाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी बजाजनगर, वाळूज महानगर श्री संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, महामंत्री चंद्रकांत चोरडिया, अनिल चोरडिया, सतीश छाजेड, मयूर चोरडिया, अशोक कोटेचा, अशोक बेदमुथा, मनोज मंडलेचा, अरुण छाजेड, मनोज कटारिया, पारस कटारिया, महावीर कांकरिया, चेतन छाजेड, रवींद्र बेदमुथा, अभय चोरडिया, आनंद कोटेचा, माजी जि. प. सदस्या ज्योती चोरडिया, पंढरपूरच्या माजी उपसरपंच पुष्पा चोरडिया, सुलोचना छल्लाणी, सुनीता मंडलेचा, कांचन तातेड यांच्यासह समाज बांधवांनाची उपस्थिती होती. या पर्युषण पर्वाच्या यशस्वीतेसाठी श्री वर्धमान श्र्वेतांबर स्थानकाचे पदाधिकारी व समाज बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.
