
वाळुज महानगर, (ता.23) – महामार्ग ओलांडणारी दुचाकी आणि पोल्ट्री फार्मची पिकअप यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगाव बस स्टॅन्डवर शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, झांजर्डी तालुका गंगापूर येथील रामचंद्र धर्मनाथ पवार (वय 30) आणि हरिचंद्र मोरे (वय 35) हे दोघे दुचाकी (एम एच 20, जी झेड – 1510) वरून छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग ओलांडत असताना छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला जाणारी पोल्ट्री फार्मची पिकअप ( एम एच, जी टी-5822) ने दुचाकी ला जोराची धडक दिली.
शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास ढोरेगाव बस स्टॅन्ड जवळ झालेल्या या अपघातात दुचाकी वरील रामचंद्र पवार आणि हरिचंद्र मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सारंगपुर मुक्कामी असणारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नानिज धाम यांची विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमींना जिल्हा रुग्णालय घाटी येथे दाखल केले.
