
लिंबे जळगाव: गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र जिकठाण येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दि१८ औगष्ट रोजी हरीकिर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून भगवान खडकेश्र्वर महादेव मंदिरात प्रत्येक सोमवारी हरीकिर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
हभप प्रेममुर्ती श्री हरीशरणगीरी महाराज पीठाधीश (रामदरबार आश्रम, बाजाठाण) यांचें सुश्राव्य सकाळी १० ते१२ यावेळेत हरी किर्तन होणार आहे. यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन अरुण पाटील बोडखे, ज्ञानेश्वर पाटील खोमणे, हरिभाऊ शिनगारे दहेगाव, सुरेश शिंदे दहेगाव यांच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी किर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन जिकठाण नागरीकांनी केले आहे.
