
वाळुज महानगर, (ता.15) – तुर्काबाद (खराडी) येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेत 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रिमझिम पावसातच अनेक ठिकाणी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून तुर्काबाद (खराडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वत्रंत दिवस मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.या ध्वजारोहन प्रसंगी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पडत्या पावसात ध्वजारोहण झाले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कल्पना संदीप पाटेकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, ग्रामपंचायत अधिकारी पुंडलिक पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन नाडे, शशिकला नामदेव पवार, शेख ईसा ईमाम, मुमताज मुनाफ शेख, फकीरचंद रहाटवाड, ज्ञानेश्वर पाटेकर, अमोल तोडकर, रुख्मिणी बालचंद शेळके, संधा संदीप पानकर, संगीता अंकुश जाधव, सईदा हबीब पठाण, अशोक मंडोरे, योगेश मेटे, अर्जुन उपळकर, विलास पवार, योगेश पानकर, किशोर नाडे, महादू जाधव, विश्वनाथ पडघन, मुख्याध्यापक सुदाम गायकवाड, गजानन लोंढे, संतोष तूपसैंदर, शेख नूर यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्ती आणि पावसाचा आनंद –
जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी देशभक्ती गीत सुरू असतानाच रिमझिम पावसाने हजेरी लावली. या रिमझिम पावसात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शालेय समिती पदाधिकारी, शिक्षक, गावकरी आणि शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करीत स्वातंत्र्य दिनाचा मनसोक्त आनंद लुटला.
