March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – अंध दिव्यांग जनांच्या विकासासाठी गेल्या 48 वर्षापासून कार्य करणाऱ्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रद्वारा संचलित स्व. आर आर बाहेती अंध मुलींचे शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्हेरॉक क्लस्टर लि. वाळूजचे एच आर हेड राहुल टोनगिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

  • याप्रसंगी व्हेरॉक कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळू कुऱ्हाडे, उपाध्यक्ष जगदीश सोनवणे, संघटक ज्ञानेश्वर तरटे, एच आर डिपार्टमेंटचे मनोज कंगले, गणेश काशिद, नारायण जाधव, कोकाटे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे गजानन सोनवणे, सतीश भुतेकर, मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर वडकर यांच्यासह अंध मुली व प्रशिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.

 

बजाज कामगारांनी केली मदत –
स्वातंत्र्य दिनी वाळूजच्या बजाज ऑटो कंपनीतील पेंट शॉप मधील कामगाराच्या वतीने या प्रशिक्षण केंद्राला किराणा साहित्य व पाण्याचे यंत्र भेट देण्यात आले. याप्रसंगी पेंट शॉपचे व्यवस्थापक पुराणिक, बजाज ऑटो एम्प्लॉइज युनियनचे सचिव विजय पवार, शशिकांत देशपांडे, एकनाथ काळे, अशोक बैनाडे, दत्तात्रय घाडगे, सुशील भावसार, आशिष पुऱ्हाड, देशमुख आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंध मुलींनी सुरेल आवाजात ध्वजगीत, राष्ट्रगीत, स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *