March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – वाळूज येथील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या वतीने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतील 500 मीटरच्या भव्य तिरंगा ध्वजाने नागरिकांचे राष्ट्रप्रेम जागृत झाले. 1 ते 14 आगस्ट या कालावधीमध्ये शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा, भारतातील विविध राज्यांची वेशभूषा स्पर्धा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण पंधरवडा अमृत महोत्सवानिमित्त गाजला गेला.

गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सुमारे 500 मीटर लांबीचा तिरंगाध्वज खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांनी ही तिरंगा यात्रा संपूर्ण वाळूजमध्ये काढली. हर हर तिरंगा, घर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून निघाले. तसेच तिरंग्याची महती सांगणारे आकर्षक पोस्टर व रॅलीचे खास आकर्षण राहिले तो प्रचंड मोठा व सुमारे 500 मीटर लांबीचा ध्वज. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या कार्यकारी संचालिका सुजाता आष्टेकर यांच्या नेतृत्वात या रॅलीची सुरवात झाली. वाळूज मधील अनेक पालक व ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. या भव्य रॅलीसाठी विभागप्रमुख एन एस सुरवसे, मंगेश काष्टे, संदीप वानखेडे, महादेव मगर, कृष्णा वनारसे, गणेश राठोड, आशिष प्रधान, राम माने, वैशाली शेटे कल्याणी कंधारकर, शोभा सातपुते, ज्योत्सना चौधरी, कपिल काष्टे, शारदा खोत, आदेश सरसे, मोहिते मॅडम, जमदाडे मॅडम, आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *