March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या सयुक्त विद्यमाने शाळेत 79 वा स्वातंत्र्यदिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाली. यावेळी ध्वजपूजन व ध्वजारोहण समाजसेवक लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत संस्थेचे अध्यक्ष आय.जी. जाधव, संस्थेचे सचिव हरीश जाधव, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, पालक प्रतिनिधी बापू वाघमारे, रेखा प्रजापती, राधा लोहार, विद्या जाधव, बालाजी घुले, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाठ, रेखा बिदरकर उपस्थित होते.

या प्रसंगी विशेष बाब म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर भव्य देखावा सादर करण्यात आला. त्याचबरोबर शाळेतून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत झांज पथक, लेझीम पथक आदीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच शाळेत याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मार्च पास, शारीरिक कवायती, लेझीम, डंबेल, झेंडा कवायत, गजरा कवायत आदी कवायती सादर करण्यात आल्या. याप्रसंगी शाळेतील ओजस्वी लोहार, दर्पण मेश्राम, अनुष्का पांचाळ, प्रेम मोरे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन व भाषणात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा नवथर यांनी केले. तर आभार गुलाब मोहिते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, परमेश्वर गीते, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, कल्याण कुलकर्णी, स्वाती पाटील, स्वाती सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, अनुराधा मुळे, छाया वाघदरे, रोशनी नेरपगार, शुभांगी नेरपगार, दिपक पठारे, पूजा गिरी, विनायक वाघमारे, लता वैष्णव, सोनी कुमारी, पूजा खोतकर, अस्मिता तायडे, पूजा ठाकूर, स्नेहा घोरपडे, वर्षा घुले, अंकिता सिंग, शरद जाधव आदीनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *