
वाळुज महानगर, (ता.15) – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत 15 ऑगस्ट रोजी तुर्काबाद (खराडी) ता गंगापूर येथे अखिल भारतिय महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने सेवाभावी डॉ. देवराज प्यारेलाल रेलन यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
समता परीषदचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. गेली 51 वर्षे अल्पदरात वैद्यकीय सेवा देणारे, गोरगरीबा पेशंटला कायम वैद्यकीय सेवा देणारे, कोरोना काळात शहरातुन येवुन प्रत्यक्ष न चुकता पेशंट तपासणारे, तीन वेळा प्रवासात अपघातातून थोडक्यात बचावलेले, स्वतःचे वय 78 वर्ष असताना फक्त 20/30 रुपयात मेडिकलसह उपचार करणारे डाॅ.देवराज प्यारेलाल रेलन यांचा स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष मोहन सोनवणे, महिला तालुका अध्यक्ष सुवर्णा गायकवाड, धोंडीराम व्होले, पोलिस पाटील रामहारी पाटेकर, सरपंच कल्पना संदीप पाटेकर, उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, पुरस्कार समिती सदस्य सोपान वाघचौरे, हभप सावता महाराज सोनवणे, बाबासाहेब वाघचौरे, कुष्णा धनायत, एकनाथ धनायत, भिमा औचरमल, फकिरचंद रहाटवाड, डॉ संजय पाटील, डाॅ मनोज गवळी, दत्तू चौधरी, शिवनाथ वाघचौरे, ज्ञानेश्वर तोडकर, सुमित जाधव, भागिनाथ नाईक, दिपक काळे, गोरख रहाटवाड, अशोक मण्डोरे, अनवर पटेल यांच्यासह तुर्काबाद (खराडी) येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
