March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – बजाजनगर वाळूज एमआयडीसी येथील आ‌‌ॅर्किड टेक्नो स्कूल व आ‌‌ॅर्किड इंग्लिश स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात पावसाळी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा क्षेत्रातील सर्वात वरिष्ठ आणि गतिमान रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल उबाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापिका तसेच इतर मान्यवरांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच पहलगाम येथे घडलेल्या घटनेचे मिशन सिंदूरच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. लहानग्या विद्यार्थ्यांनी दिलेली दिमाखदार भाषणेही उपस्थितांच्या मनात घर करून गेली. प्रमुख पाहुण्यांचे व मुख्याध्यापिका यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. देशभक्तीच्या वातावरणात व उन्मुक्त आनंदात स्वातंत्र्यदिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *