
वाळूज महानगर, (ता.9) – बजाजनगरातील मोहटा देवी मंदिरात श्री शनि देव, स्वामी समर्थ, गणपती, दत्तात्रय, संत गजानन महाराज, बजरंग बली, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, साईबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोमवार 11 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

या सर्व मुर्त्याचे बजाजनगर येथे शुक्रवारी सायंकाळी आगमन झाले. त्या प्रीत्यर्थ मोरे चौकातून मंदिरापर्यंत सवाद्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू खेडकर, भागवत सांभारे, विष्णू अंबाडकर, गणेश पळसकर, ज्ञानेश्वर धुर्वे, नेमिनाथ खरबडे, फुंदे यांच्यासह मोहटादेवी योग वर्गाचे सदस्य आणि भाविकांची उपस्थिती होती.
