March 25, 2026


वाळूज महानगर, (ता.31) – ऑटो रिक्षा चालक असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत लिंबे जळगाव येथील नागझरी नदी पात्रात मृतदेह आढळून आला. मात्र त्याने आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला. याबाबत पोलीस संभ्रमात आहे. ही घटना गुरुवारी 31 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत वाळूज ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे यांनी दिलेली माहिती अशी की, लिंबे जळगाव येथील नागझरी नदी पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडून आहे. अशी माहिती युनूस पटेल यांनी गुरुवारी 31 जुलै रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दिली. ही माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार मल्हार गरगडे, अरुण घुगरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व रोहित शिंदे यांच्या मदतीने कुजलेला मृतदेह पाण्यातून वर काढून घाटीत दाखल केला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


अशी पटली ओळख –
पोलिसांनी कुजलेला मृतदेह पाण्यातून बाहेर काढून त्याची तपासणी केली असता त्याच्या खिशात ऑटो रिक्षा ची चावी मिळाली. मृतदेह आढळलेल्या ठिकाणापासून जवळच छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गवरील पुलाजवळ बेवारस उभ्या असलेल्या ऑटो रिक्षा (एम एच 20, ई एफ- 8278) ला पोलिसांनी ही चावी लावली असता ती उघडली. या रिक्षामध्ये एक मोबाईल होता. या मोबाईलमध्ये आलेल्या कॉलवर पोलिसांनी कॉल करून माहिती घेतली असता त्याची ओळख पटली. दिलीप पुंजाराम नरवडे, वय 35 वर्ष असे त्याचे नाव आहे. तो खाजा गरीब नवाज हॉटेलजवळ, राहुलनगर छत्रपती संभाजीनगर येथील तो रहिवासी आहे.

             कारण अस्पष्ट –

 दिलीप पुंजाराम नरवडे याचा मृतदेह कुजलेला असल्याने तो दोन-तीन दिवसापूर्वीचा असावा. असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याने आत्महत्या केली की, त्याचा कोणी घातपात केला. त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने वाळूज पोलीस ‘खून की, आत्महत्या’ या संभ्रमावस्थेत पोलीस सापडले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *