
वाळूज महानगर, (ता. 18) – तुर्काबाद (खराडी) येथील श्री विठ्ठल मंदिरात 165 वर्षाची परंपरा लाभलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला मंगळवारी (दि.15) सुरुवात झाली. 22 जुलै पर्यंत सुरू राहणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होऊन दुपारी महाप्रसादाचे विविध अन्नदात्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी 5 ते 7 काकडा, 10 ते 12, गाथा भजन, दुपारी 12 ते 2, महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन 6 ते 7 हरिपाठ व 8 ते 10 हरी किर्तन सेवा व हरीजागर होणार असून यात अनुक्रमे हभप गंगाधर महाराज राऊत, महाले महाराज, राम शास्त्री व्यवहारे, किशोर महाराज निकम, विशाल महाराज, महाले महाराज, धर्माचार्य हभप डॉ जनार्दन महाराज मेटे यांचे सुश्राव्य हरीकीर्तन होणार आहे. मंगळवारी 22 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 हभप महाले महाराज यांचे काल्याचे हरीकीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह, किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे अवाहन तुर्काबाद येथील विठ्ठल मंदिर कमीटीतर्फे करण्यात आले आहे.
