March 25, 2026


वाळूज महानगर, (27) – वाळूज परिसरातील करोडी येथे एका कुंटणखाण्यावर छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या छाप्यादरम्यान पकडलेल्या पाच आरोपीना अटक करून त्यांच्या ताब्यातून जवळजवळ एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 26 जून रोजी पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांच्या पथकाने केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे करोडी (छत्रपती संभाजीनगर) येथे काही महिलांना डाबुन ठेवुन त्यांच्याकडुन वेश्यव्यवसाय करवुन घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप आयुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांना मिळाली. या माहितीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या पथकाने गुरुवारी 26 जून रोजी तेथे छापा टाकला असता तेथे आरोपी कृष्णा प्रकाश चव्हाण, (वय-24 वर्ष), धंदा हॉटेल, रा.गट नं 9 ग्रेंड सरोवर हॉटेलच्या बाजुला तिसगांव, रवि काशिनाथ पौळ, (वय-38 वर्ष), धंदा हॉटेल चालक रा.जामा मजिद जवळ पोळ रांजणगांव, किशोर सुखलाल गणराज, (वय-30 वर्ष), धंदा हॉटेल चालक रा. पंढरपुर फुलेनगर (एम. आय. डी. सी वाळुज), कमलेश एकनाथ भालेराव, (वय 23 वर्ष), धंदा मॅनेजर रा. गल्ली नं 3 आंबेडकरनगर तिसगांव, संजय मानसिंग जाधव, (वय-41 वर्ष), धंदा सफाई कामगार रा. हिरापुरी ता. गेवराई जि. बिड हे मिळून आले. पकडलेल्या आरोपींच्या ताब्यात 5 पिडीत महीला आढळुन आल्या. या सर्व पीडित महिलांची सुटका करुन पोलिसांनी 1 लाख 59 हजार 220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस अंमलदार धर्मराज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, पोउपनि वैभव मोरे, सफौ. शशिकांत सोनवणे, पोह. भास्कर गायकवाड, देविदास गडवे, पोलीस अंमलदार धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, जयदिप आढे, शिवाजी होडशिळ, मपोह वर्षा मुढे, मनिषा दाभाडे, सोनाली म्हस्के यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *