March 25, 2026


वाळुज महानगर, (ता.25) – श्री. हनुमान जगन्नाथराव भोंडवे पाटील हे एक नाव नसून वाळूज, पंढरपूर व बजाजनगर या परिसरातील व्यावसायिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील एक अत्युच्च नाव आहे. या शाळेचे सर्वेसर्वा हनुमान भोंडवे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाप्रित्यर्थ पालक व विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ तथा वक्ते डाॅ. विठ्ठल लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्यानात आपण आपल्या जीवनातील संधी ओळखून त्या संधीचे सोने करण्यासाठी प्रचंड मेहनत करा. मला जीवनात शिक्षण घेण्याची संधी मिळाली म्हणून मी मोठा झालो. शिक्षण ही एक आयुष्यात मिळणारी खूप मोठी संधी आहे. अशा संधींचे विविध प्रसंग सांगून उपस्थितांना उत्साहीत केले. तसेच इमानदारी, कष्ट आणि प्रामाणिकपणा या तीन शक्तींमुळे मनुष्य जगात महान बनतो. म्हणून प्रचंड मेहनत करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. फक्त परीक्षेच्या दिवशी अभ्यास करून यश मिळत नाही तर वर्षभर सातत्याने अभ्यास करून यश मिळत असते असा मौलिक सल्ला विद्यार्थी व पालकांना त्यांनी दिला. मायबाप घरात असणं यासारखी चांगली गोष्ट जगात दुसरी नाही. तसेच आपल्या आयुष्यातील वास्तव, भावनिक प्रसंग सांगितले. यावेळी उपस्थित सर्व पालक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना आपले अश्रू अनावर झाले.

या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव मीनाक्षीताई भोंडवे, गणेश भोंडवे, स्नेहल भोंडवे, शाळेचे मुख्याध्यापक अविराज काळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, मिडल स्कूल प्रमुख राणी सावंत, प्राथमिक प्रमुख गेहना शादीजा, समन्वयक मंदाकिनी, स्व. भैरोमल तनवाणी शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे, वैभव पवार, भोंडवे पाटील पब्लिक स्कूल व ज्ञान भवन पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी कु. ईश्वरी गणगे व श्रेया अक्कुर यांनी केले. हे जग सुखी व्हावे, राज्यगीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *