
वाळूज महानगर, (ता.13) – साधू संतांची संगत आपल्याला समाधान देते. म्हणूनच साधुसंत येती घरात तुझी दिवाळी दसरा असे म्हटले जाते. असे प्रतिपादन अमळनेर दिंडीचे स्वागत करताना बजाजनगर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भैय्या चोरडिया यांनी केले. 
अमळनेर येथून सुरु झालेली व श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणारी पायी दिंडी सलग सतरा वर्षांपासून चोरडिया यांच्या घरी येत असते. या दिंडीचे आयोजक हभप धर्मभूषण भागवताचार्य किशोर महाराज सोनखेडी हे होते. यावेळी दिंडीतील भाविकांना चहा, नाश्ता देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वारकऱ्यांनी गवळण, भारुड, भजने, फुगडी सादर केली. चोरडिया परिवारातील सदस्यांनीही फुगडी खेळून या सुखद क्षणाचा आनंद घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई चोरडिया, शांतीलालजी चोरडिया, विमलताई चोरडिया, अभय चोरडिया, सरला चोरडिया, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया, दिंडी चालक चंदू महाराज, हभप गुलाबसिंग गिरासे, हभप ठाणसिंग मोरे, हभप भागवत महाराज, हभप बापू महाराज, विणेकरी हभप वसंत आबा, सरकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित चोरडिया, राजाराम पाटील, दादाराव गोराडे तसेच अंमळनेर व बजाजनगरातील भाविकांची उपस्थिती होती. सुनील गोरे, आशिष पावडे, अक्षय चोरडिया, यश चोरडिया, वैशाली चोरडिया, पायल चोरडिया, श्रुती चोरडिया यांनी दिंडी सोहळ्यामध्ये हिरीरीने भाग घेतला.
