March 23, 2026

बजाजनगर, (ता.31) – दौलताबाद येथील मठात श्री संत स्वामी मानपुरी महाराज यांची पुण्यतिथी श्रध्दा व भक्तिभावाने शनिवारी (ता.31) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त दौलताबाद गावातील स्वामींच्या प्राचीन मठात दुपारी समाधी पूजन, महाआरती, महाप्रसाद आदि कार्यक्रम झाले. स्वामी मानपुरी महाराजांनी असंख्य धार्मिक व आध्यात्मिक विषयांवर भजने लिहलेले असून अनेक भजनी मंडळे त्यांच्या भजनांचे गायन करतात. पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता.31) रोजी पंचक्रोशीतील गावातील भजनी मंडळाने येथे येऊन भजने सादर केली. पुजारी कैलास, राजेंद्र व भगवान दुबे यांच्या हस्ते पूजा, आरती करण्यात आली. याप्रसंगी ह.भ.प.पांडुरंग महाराज वाघ, सोमनाथ आढाव, शंकरराव जाधव, राजू ठाकूर, गणपत जाधव, नारायण मेणकर, चंद्रभान जाधव, ज्ञानेश्वर गवळी, जयसिंग बल्लोज, रत्नाकर देशपांडे, विश्वंभर आनंदे, साहेबराव नरोडे, अशोक आगळे, गणेश जाधव, दत्तू गोरे, मच्छिंद्र जाधव, भाऊसाहेब बळी, दशरथ सिंह, श्री संत गोरोबा काका भजनी मंडळ व श्री संत मानपुरी स्वामी महाराज भजनी मंडळ दौलताबाद यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *