
वैजापूर, (ता.24) – चांडगांव ता.वैजापुर येथे मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण कुणबी शोध मोहिम सुरू आहे. चांडगांव गावातील वाणि व हगवणे परीवारातील 20 कुणबी प्रमाणपत्र मराठासेवक प्रशांत काका सदाफळ यांच्या हस्ते शनिवारी (ता. 24) मे 2025 रोजी वाटप करण्यात आले. 
यावेळी मराठा सेवक ज्ञानेश्वर पाटील इंगळे, निलेश लाडवाणी यांच्यासह गांवकरी सचिनभाऊ रहाणे, नवनाथ भागिनाथ हगवणे, विठ्ठल महादू वाणी, रघुनाथ इंद्रभान वाणी, संतोष नानासाहेब रोठे, संतोष जयंता रोठे, भीमराज लक्ष्मण तुपे, आकाश हागवणे, प्रशांत राहणे, आकाश राहणे, शंकर तुपे, गौरव तुपे, विशाल वाणी, किसन राहणे, अशोक रामभाऊ गायकवाड, बाबासाहेब आसाराम रोठे, उमेश रोठे, कारभारी हंसराज वाणी,
गोरख सकाहारी वाणी, गोविंदराव गायकवाड, मोहनराव साळुंखे, पो.पा.भाऊसाहेब रंगनाथ रहाणे, अरुण सकाहारी वाणी, गणेश ज्ञानोबा हगवणे, इंद्रभान रामकृष्ण वाणी, प्रतीक भाऊसाहेब वाणी, ज्ञानेश्वर वाणी, रामनाथ हरिश्चंद्र रोठे, जालिंदर कोंडीराम राहणे, उमेश भास्कर रोठे, तानाजी कारभारी साळुंखे आदि समाज बांधव उपस्थित होते.
