
वाळुज महानगर, (ता. 16) -: एकलहेरा येथे शनिवारी (ता. 17) रोजी सकाळी जगद्गुरू स्वामी शांतीगीरी महाराज यांचे आगमन होत असुन त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
परीसरातील भाविकांनी प्रवचन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन पुंजाराम गांगर्डे, वाल्मीक गांगुर्डे, राजु कानडे, लक्ष्मण फोलाने, पप्पु इथापे, दत्तु गांगुर्डे, संतोष जाधव, राजु प्रधान, दंडे पाटील आदींसह जय बाबाजी भक्त परीवार यांनी केले आहे.
