March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 15) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर येथील उच्चभ्रू वसाहतीतील राहणाऱ्या उद्योजकाचा बंगला सहा दरोडेखोरांनी फोडून केअरटेकरला पिस्तूलाचा धाक दाखवून 40 किलो चांदी, 8 किलो सोने मिळून जवळजवळ अर्धा क्विंटलचा ऐवज व रोख 70 हजार रुपये. असा करोडो रूपयाचा ऐवज लुटून नेला. गुरुवारी (ता.15) रोजी पहाटे झालेल्या या थरारक घटनेमुळेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील के-237 मध्ये असलेल्या दिशा ऑटो कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक संतोष राधाकिसन लड्डा हे कुटुंबासह बजाजनगरातील उच्चभ्रू वसाहत प्लॉट नंबर आर एल- 93 मध्ये राहतात. त्यांचा मोठा मुलगा क्षितिज लड्डा हा अमेरिकेत शिक्षण घेत असल्याने बजाजनगर येथील बंगल्यात राहत असलेले संतोष लड्डा, त्यांची पत्नी राखी लड्डा व मुलगा यश असे सर्व कुटुंबीय अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे वळदगाव येथील संजय झळके हे केअरटेकर लड्डा यांच्या बंगल्याची रखवाली आणि देखभाल करण्यासाठी बंगल्यातच झोपले होते.

गुरुवारी (ता.15)रोजी) मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान 6 दरोडेखोरानी गेटच्या मध्ये प्रवेश करत केअरटेकरला पिस्तूल लावून 40 किलो चांदी, 8 किलो सोने तसेच रोख 70 हजार रुपये लुटून दरोडेखोर पसार झाले. या घटनेमुळे परिसरातील उद्योजकासह नागरिकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे, अरविंद शिंदे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, संदीप काळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, योगेश शेळके, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अमोल शिंदे, वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, छावणीचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह स्वानपथक ठसे तज्ञ आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे व सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तपास कामी सूचना केल्या.

कारमधून आले दरोडेखोर –
एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून सहा दरोडेखोर आले. बंगल्याच्या शेजारी त्यांनी कार उभी करून बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. शिडीच्या सहाय्याने प्रथम बंगल्याच्या गच्चीवर गेले. तेथील दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला.

            पिस्तूलचा धाक दाखवून हातपाय बांधले –
गच्चीवरून आत आल्यानंतर दरोडेखोरांनी तेथे झोपलेल्या केअरटेकर संजय झळके याला पिस्तूलचा धाक दाखवून ओढणीच्या सहाय्याने त्याला बांधून टाकले. तसेच तो ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर सोने, चांदी व रोख रक्कम मिळून कोट्यावधीचा ऐवज लुटून नेला. अशी माहिती मिळत आहे.

शेजाऱ्यांनी केली मदत –
दरोडेखोर गेल्यानंतर केअरटेकर संजय झळके याने शेजाऱ्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी संजय झळके यांचे हातपाय सोडून तोंडावर बांधलेली चिकटपट्टी काढली. त्यानंतर ही दरोडेची घटना उघडकीस आली.

सीसीटीव्हीत आले चित्रण –
गुरुवारी भल्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास 6 दरोडेखोर एका पांढऱ्या कारमधून उतरतात. संरक्षण भिंतीवरून उड्या मारून ते संतोष लड्डा यांच्या बंगल्यात जातात. आणि पहाटे 4 वाजेच्या सुमारास बंगल्यातून ऐवज घेऊन बाहेर येतात. या घटनेचे सर्व चित्रण शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेरात आले आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू –
दरोड्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच माहीती घेत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान संतोष लड्डा यांच्या बंगल्यासमोर व परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *