
वाळूज महानगर, (ता.14) – भाजी आणण्यासाठी जाते. असे नातेवाईकाला सांगुन एक वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गेलेली 23 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाली. ही घटना सोमवारी (ता.12) रोजी सांयकाळी 6 वाजेच्या सुमारास वाळुज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील पवननगर, रांजणगाव (शेणपुंजी) येथे नवाज महमुद शेख (वय 30 वर्षे) हा पत्नी असमा (वय 23 वर्ष), एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह राहत होता. सोमवारी (ता.12) रोजी सकाळी 9 वाजता नवाज शेख हा कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्यावेळी पत्नी व मुले घरीच होती. सांयकाळी 6 वाजता तो घरी आला असता पत्नी व मुलगी दिसुन आले नाही. त्यामुळे त्याने जवळच राहत असलेल्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, असमा व मुलगी भाजीपाला घेण्यासाठी राहते घरून सांयकाळी 4.30 वाजेच्या सुमारास गेली आहे. त्यामुळे त्यांची बराच वेळ वाट पाहिली. परंतु, ती घरी परतली नाही. म्हणुन पत्नी असमा व मुलीचा राहते घराच्या परिसरात तसेच आजुबाजुच्या भागात, बसस्टैंड, रेल्वेस्टेशन तसेच नातेवाईकांकडे फोन करुन विचारपुस केली व इतरत्र शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. याप्रकरणी नवाज महमूद शेख (वय 30) यांच्या तक्रारीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याचे नोंद करण्यात आली.
त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे – नाव असमा भ्र. नवाज शेख वय 23 वर्ष, शरीर बांधा साधारण, रंग गोरा, उंची 4 फुट 6 इंच, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे, अंगात काळ्या रंगाचा बुराखा, मराठी, हिन्दी भाषा बोलते, सोबत मुलगी नामे अनया पिता नवाज शेख वय 1 वर्ष.
