वाळुज महानगर, (ता.14) – श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारार्थ दाखल केलेल्या शिवराई येथील पंचवीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.14) रोजी सकाळी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय बिरबल ठाकुर (वय 25 वर्ष) रा. शिवराई ता गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यास राहते घरी श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने त्यास मंगळवारी (ता.13) रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास संदिप कुमार यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. त्याच्यावर वार्ड क्र.6 मध्ये औषधोपचार चालु असतांना अजय ठाकुर याचा बुधवारी (ता.14) रोजी सकाळी 7:30 वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे पोलीस हवालदार बी डी गुरुभैये यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण जाधव करीत आहे.
