March 23, 2026

 


वाळुज महानगर, (ता. 6) – वाळूज परिसरातील एका हॉटेलच्या किचनमध्ये सोमवारी (ता.5) रोजी रात्री तुफान राडा झाला. यात काही महिला व पुरुष असे सहा ते सात जण हातात काठ्या घेऊन काही जणांना अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

याबाबत सांगितल्या जाते की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी येथील तिरुपती हॉटेलमध्ये हा राडा झाला. सोमवारी (ता.5) रोजी रात्री हा प्रकार घडला. या अमानुषपणे झालेल्या मारहाणीचे चित्रण सीसीटीव्हीत आले असून त्याचा व्हिडिओ परिसरात व्हायरल होत आहे. या घटनेतील जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हा राडा कोणत्या कारणामुळे झाला. आणि इतकी अमानुषपणे मारहाण का करण्यात आली. विशेष म्हणजे यातील मारहाण करणारे काही जण अर्धनग्न अवस्थेत होते. या घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळल्या जात आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *