February 5, 2026
मयत सतीश पुजारी

वाळूज महानगर –

भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत
45 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मंगळवारी (ता.30) सकाळी मयत झाला.या अपघाताची घटना लिंबे जळगाव येथील बसस्टॉपजवळ सोमवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली.
सतीष सुभाषराव पुजारी (46) रा. लिंबे जळगाव ता. गंगापूर असे मयताचे नांव आहे. याबाबत पोलीसांनी सांगितले की, सतीष‌ हा महामार्गावरुन पायी जात असताना भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास संतोष पुजारी व रमा पुजारी यांनी नागरीकांच्या मदतीने घाटीत उपचारार्थ दाखल केल. मात्र उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी (ता.30) सकाळी 6वाजता मृत्यू झाला.
या प्रकरणी घाटीतुन आलेल्या माहितीनुसार वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेका दशरथ खोसरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *