March 23, 2026

वाळुज महानगर, (ता. 5) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बजाजनगर येथील ऑर्किड जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक यश प्रात  केले आहे. यशाचे शिखर गाठत सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखेचा १००% निकाल लागला.

यात गुरव चैतन्य याने ९५.८३% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. त्यात त्याने संस्कृत व अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. धोत्रे रितेश याने ९३.१७% गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला, त्यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. निकम अजित याने ८९.६७% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. यात त्याने अकाउंट या विषयात १०० गुण मिळवले. तसेच, दाभाडे लावण्या हिने  ८७.१७%, पांडे मेहेक ८६.३३%, राठोड ओम ८६.१७%, बसवदे साईराज ८५.६७%, सिन्हा मोहितकुमार  ८५.१७%, गायकवाड सागर ८४.८३%, विजयवर्गीय तनया ८४.०५%, खवले आदित्य ८३.६७% गुण प्राप्त केले. सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे ऑर्किड ग्रुपच्या सदस्यांनी आणि पालकांनी कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेछा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *