
वाळुज महानगर, (ता.25) – वाळूज ते कासोडा या रस्त्यावरील अण्णाभाऊ साठेनगरात रस्त्याच्या काँक्रिटीकरणचे काम ग्रामपंचायत वाळूज तर्फे हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम मोजमाप केल्यानुसार न करता अर्धवट होत असल्याचा आरोप करत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

हा रस्ता कासोडा रोड ते नृसिंह विद्यामंदिर, रामराई रोड, पत्रा कॉलनी, गॅस गोडाऊन यांना जोडणारा वस्तीमधील अंतर्गत मुख्य रोड आहे. या रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची, शालेय विद्यार्थ्यांची, कामगारांची रहदारी असून नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या, दृष्टीने हा रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रोड नसल्याकारणाने प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे, शालेय विद्यार्थ्यांचे, कामगारांचे अतोनात हाल होत असतात. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून रोड तयार व्हावा. यासाठी वारंवार निवेदन दिले आहेत. असे असतानाही मुद्दामहून नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या, मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरीही ग्रामसेवक, सरपंच यांनी निवेदनाची दखल घेऊन रोड मोजमाप घेतल्याप्रमाणे, ठराव घेतल्याप्रमाणे तयार करावा. व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे. अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या कार्यालयापुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ प्रा राम बाहेती, कॉ ॲड अभय टाकसाळ, कॉ ॲड रतन अंबिलवादे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर कॉ. विठ्ठल त्रिभुवन, कॉ इब्राहिम पटेल, आकाश कीर्तिकर, दीपक जाधव, बाबासाहेब दुशिंग, अण्णा तुपे, बाळू दुशिंग, विकास थोरात, संतोष शेरे, अरुण सातुरे, संदीप थोरात, रतन खंडागळे, सुमय्या पठाण, समीना पठाण, रईसा शहा, सना शहा, गणपत ससाने, सुजाता नरवाडे, छाया त्रिभुवन, सोमेश त्रिभुवन, अभय त्रिभुवन, दीपक सोनवणे, शफिक पिंजारी, योगेश वाहूळ, जगन्नाथ दुशिंग, सचिन मरसाळे, संदीप गणराज, राजू साळवे, विकी जाधव, मनीषा जाधव, राजू शहा, एजाज पठाण, भाग्यश्री नितनवरे आदींच्या सह्या आहेत.
