March 25, 2026

वाळुज महानगर, (ता.25)- जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे वसुंधरा प्रतिमेचे पूजन करून सोमवारी (ता 21) रोजी वसुंधरा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी सरपंच अमर राजपूत, ग्रामपंचायत सदस्य विष्णू झळके, बाळू खोतकर, विनोद खोतकर, तलाठी शेळके, पोलिस पाटील प्रकाश म्हस्के उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिंढे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
वातावरणातील दिवसेंदिवस होणाऱ्या बदलावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 22 ते 30 एप्रील या कालावधीत पृथ्वीचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून “पर्यावरण बचाओ वसुंधरा ” हे ब्रीद घेवून नदी संवर्धन, नदी स्वच्छता, तलाव स्वच्छता करणे, शाळा महाविद्यालय मधून जनजागृती करणे, पृथ्वी, आकाश, जल, वायु, वृक्ष संवर्धन या विषयांवर काम करण्यात येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *