March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.24)- जमिनीच्या हिश्यावरून झालेल्या वादानंतर चुलती (काकू) व आजीने हाताचापटाने मारहाण केली. तसेच चुलत्याने चाकू मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता. 23) रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान वडगाव (कोल्हाटी) येथे घडली.


याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा की, वडगाव (कोल्हाटी) येथील करण मारुती गायकवाड (वय 25) व त्याचा चुलता गोरख उत्तम गायकवाड यांच्यात जमिनीचा हिस्सा देण्याच्या कारणावरून बुधवारी (ता. 23) रोजी सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान वाद झाला. यावेळी करण गायकवाड याची चुलती ( काकु) ज्योती गोरख गायकवाड, आजी शोभाबाई उत्तम गायकवाड रा.शिवाजीनगर वडगाव (कोल्हाटी) ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांनी करण याला हाताचापटाने मारले व चुलता (काका) गोरख उत्तम गायकवाड यांनी चाकु मारुन जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी करण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र उदे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *