वाळुज महानगर, (ता.19) – मोटार मालक कामगार वाहतूक संघटना तर्फे वाहनचालक व कामगारांसाठी वाळूज औद्योगिक वसाहतीतील वाहनतळ (ट्रक टर्मिनल) जवळ कामगार चौकात थंड पाणी पिण्यासाठी मोफत पाणपोई सुरू करण्यात आली.

उन्हाची तीव्रता व पिण्याच्या पाण्याची गैरसोय, लक्षात घेऊन वाळूज औद्योगिक वसाहतीतील मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेच्या वतीने कामगार चौकाजवळील ट्रक टर्मिनल येथे पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोकूळ तुपे, जिल्हा सचिव मुकेश मंगरुळे, तालुका अध्यक्ष अमर तरटे, भीमराव दहिफळे, मनीष परमार, युवराज मोगल, रामेश्वर चौधरी, तुषार कुंटे आदींचे सहकार्य लाभले. या पाणपोईचा लाभ कामगार वर्ग, वाहनचालक याना मिळणार आहे.
