March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.19) – खंजिरी भजनातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 116 व्या जयंती (ग्रामजयंती) निमित्त बजाजनगर येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या सभागृहात गुरुवार 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनी सर्व पंथीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

एक मे रोजी होणारी ही स्पर्धा पुरुष व महिला भजनी मंडळासाठी खुली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस 7 हजार 501रुपये, द्वितीय 5001, तृतीय 3001 सर्वोत्कृष्ट महिला भजनी संघाला 1101, तसेच उत्कृष्ट भजन गायक, खंजीरी वादक, हार्मोनियम व तबला किंवा पखवाज वादक असे प्रत्येकी 500 बक्षिसे व स्मृती चिन्ह देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेतील सहभागी सर्व भजनी मंडळातील सदस्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.
राष्ट्रसंतांच्या मराठी व हिंदी भजनाचा संत भूमी मराठवाड्यात प्रचार प्रसार व्हावा. या उद्देशाने ही स्पर्धा गेल्या 2 वर्षापासून आयोजित करण्यात येते. यासाठी स्पर्धेतील सर्व सहभागी संघानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित किमान 2 भजने, अभंग सादर करणे ही प्रमुख अट आहे. उर्वरित भजन, अभंग, गौळण, कोणत्याही संत रचनांचे गायन करावे. प्रत्येक संघास 20 मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धा

सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत होणार असून त्यानंतर लगेचच मान्यवर अतिथींच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ, प्लॉट नं.ओ. एस. 19/1, जागृत हनुमान मंदिर (आर.एक्स.ग्रुप )च्या मागे बजाजनगर, एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर येथे 9975214554 किंवा 9850017421 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *