
वाळुजमहानगर, (ता.8) – वाळूज औद्योगिक वसाहती मधील इप्का लॅबोरेटरीज लि, युनिट-2 कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी (ता.8) रोजी घेण्यात आली.
यात रमेश बिरादार यांची चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी विक्रम आरळे व सचिवपदी सचिन पाटील यांची तर संजय गायकवाड, तुषार शिंदे, अवीन शेळके, मनोहर यादव. नीलकंठ गोसावी, महादेव फुलपगार यांची सोसायटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी वायफळ होणारा खर्च व वेळ वाचवल्याबद्धल कंपनीतील कर्मचारी व कामगारांकडून सोसायटी समितीचे व सभासदांचे कौतुक व स्वागत करण्यात आले. यावेळी किरण चौधरी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.
