February 5, 2026
भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये खेळांची प्रत्यक्षिक करताना विद्यार्थी

वाळूजमहानगर – बजाजनगर येथील भोंडवे पाटील पब्लिक स्कूल मध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती प्रित्यर्थ साजरा होणारा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन भोंडवे पाटील पब्लिक स्कूलमध्ये दररोजच्या वेळापत्रकात सकाळचा एक तास योगासाठी व सायंकाळचा एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येतो. क्रीडा दिनानिमित्त सोमवारी (ता.29) रोजी कबड्डी, खोखो, हॉलीबॉल, टेबल टेनिस, चेस, कॅरम, रोप स्केटिंग, ॲथलेटिक्स, योगा अशा विविध खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्याचबरोबर शाळेतील क्रीडा शिक्षक ओम प्रकाश वाघमारे, सौरभ गोस्वामी, शैलेश कावळे यांनी सर्व क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच शाळेतील कलाशिक्षक जीवन काळे व कपिल काष्टे यांनी मेजर ध्यानचंद यांची आखीव रेखीव प्रतिमा साकारली. यावेळी शाळेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, मुख्याध्यापक रवी दाभाडे, पर्यवेक्षक फ्रान्सिस अँथनी, राणी सावंत, गहना शहा यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *