
वाळूजमहानगर, (ता.4) – केंद्र शासनातर्फे चालवणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश चाचणी परीक्षेत तिसगाव परिसरातील व्ही.आय.टी. इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी प्रेम इंगोले याने यश मिळवले.

तो इयत्ता 9 वी साठी प्रवेशपात्र ठरला आहे. या यशाबद्दल त्याचा शाळेत शाळेचे संचालक संजय कुलकर्णी, सिद्राम पारे, योगिता डबीर, मुख्याध्यापिका मैथिली भाले यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या शिक्षकांसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
