March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – लग्न न करता प्रियकरासोबत त्याच्या घरात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेवर प्रियकर व त्याचे दोन सख्खे व एक चुलत भाऊ अशा चौघांनी बलात्कार केला. सन 2020 ते 2024 दरम्यान घडलेला हा प्रकार गुरुवारी (ता.3) रोजी उघडकीस आला. या घटनेमुळे वाळूज परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुलढाणा येथील अनुसूचित जातीची 34 वर्षीय पिडित विवाहिता 8 वी मध्ये असताना 2007 मध्ये तिच्या शाळेची सहल छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ गार्डन येथे आली होती. त्यावेळी तिची नितीन जयचंद सावजी (ब्राह्मण) रा. छत्रपती संभाजीनगर याच्याशी ओळख होऊन त्यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. हे प्रेमप्रकरण पीडितेच्या आई-वडीलांना माहित झाल्याने त्यांनी 2010 मध्ये तिचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाशी करून दिले. त्यानंतर दोघेही सोबत दोन ते तीन वर्षे वाळूज परिसरातील राजणगाव (शेणपुंजी) येथे राहिले. मात्र तिला त्याच्या सोबत राहायचे नसल्याने ती नितीन सावजीसोबत 2012 मध्ये निघुन आली. आणि त्याच्यासोबत बजाजनगर येथे 5 ते 6 वर्ष राहिली. तेव्हा नितीन जयचंद सावजीच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ लक्ष्मीकांत जयचंद्र सावजी व त्याची पत्नी, दुसरा भाऊ प्रविण व त्याची पत्नी असे सर्व एकत्र राहत होते. तिचे आणि नितीनचे लग्न झाले नाही, तरीही ते सोबत राहत होते. तीला नितीन सावजी याच्यापासुन 13 वर्षाचा मुलगा व 6 वर्षाची मुलगी आहे.
असा घडला प्रकार –
नितीन सावजीचे स्वतः चे घर ओमसाईनगर राजणगाव येथे होते. तेथे 2018 ते 2024 पर्यंत ते राहिले. दरम्यान 2020 मध्ये एका सणाला नितीनचा दुसरा भाऊ प्रविण जयचंद्र सावजी (ह.मु अंबरनाथ ठाणे) हा घरी आला. व सर्वजण झोपलेले असताना रात्री त्याने पिडितेसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. हे सर्व नितीन सावजीला माहिती होते. त्या दोघांच्या संगणमताने हे सर्व होत होते. तसेच त्याने त्याच वर्षी तिच्याशी पुन्हा जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.
नितीनची होती सहमती –
2022 मध्ये नितिनचा चुलतभाऊ राजु सावजी
रा. खुलताबाद हा एका रविवारी रांजणगाव येथील घरी मुक्कमी आला. त्या रात्री नितीन घरी असताना राजुने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. तेव्हा नितीन हा त्याला काहीच बोलला नाही. उलट तिलाच जातीवाचक शिवीगाळ केली. नंतर नितीनने तीला मारहाण व घाण घाण शिवीगाळ करणे सुरू केले.
पीडीतेच्यामुलीवर सुद्धा अतिप्रसंग –
14 एप्रिल 2024 रोजी रांजणगाव येथील रूमवर सायंकाळी 7 वाजता नितीनचा मोठा भाऊ लक्ष्मीकांत याने पीडीतेच्यामुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत पिडितेला म्हणाला की, तु मला तुझ्या सोबत शारीरीक संबंध बनवु दे, नाही तर मी तुझ्या मुलीचे जीवन बर्बाद करेल’, तेव्हा त्याचे नाईलाजाने ऐकावे लागले. तेव्हा लक्ष्मीकांत याने तिची इच्छा नसताना जबरदस्तीने शरीर संबंध केले. आणि त्याचा व्हिडीओ बनवला.
चौघांविरुद्ध गुन्हा –
याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकर नितीन जयचंद सावजी (वय 34), सख्खे भाऊ लक्ष्मीकांत जयचंद सावजी (वय 44) दोन्ही ह.मु. बजाजनगर, प्रविण जयचंद सावजी (वय 44) ह.मु अंबरनाथ ठाणे, व चुलत भाऊ राजु सावजी अंदाजे (वय 40) रा. खुलताबाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *