March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.2)- राष्ट्रीय व्हीलचेअर तलवार बाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत वंदना सैतवाल जैन हिने चमकदार कामगिरी करून कास्यपदक जिंकले. भुवनेश्वर (ओडीसा) येथे 28 व 30 मार्च 2025 यादरम्यान दिव्यांगांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.

ओडिशा भुवनेश्वर येथे 17 वी राष्टीय पॉरा व्हीलचेअर तलवार बाजी स्पर्धा 28 व 30 मार्च दरम्यान मोठ्या उत्साहात झाली. त्यामधे महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करत वंदना सुनील सैतवल जैन हिने पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले. तिने आतापर्यंत ॲथलेटिक तसेच तलवार बाजी असे एकूण 12 पदक मिळवले आहे.

 

याबद्दल वाळूज येथील सरपंच सईद नबी पठाण यांनी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उत्तम भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन काकडे, रामेश्वर मालुरे आदींनी तिचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *