March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – बजाजनगर येथील श्रीराम मंदीर अयोध्यानगर येथे राम जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अठराव्या अखंड हरीनाम सप्ताहला रविवारी (ता.30) रोजी सकाळी ध्वजारोहन, व्यासपीठ पुजन, विणा पुजन करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.


यावेळी उद्योजक हनुमान भोंडवे, वडगाव (को.) -बजाजनगरचे सरपंच सुनिल काळे, श्याम बनसोडे, श्री निवास सर, कैलास भोकरे, पतंजली योग समितीचे जनार्धन नवसरे, श्रीराम मंदीर सेवाभावी संस्थेचे गोंविद जवणे, अवचितराव मोरे, रामनाथ उढाण, आनंद देवर, पोपटराव म्हस्के, सतिष ठुले, विजय खेंगरे, बापुराव गवते, संजय साबळे, कैलास बारगळ, भाऊसाहेब शिनगारे, तोरे बाबा यांच्यासह अयोध्यानगर मधील भाविकांची उपस्थिती होती.

बजाजनगरच्या आयोध्यानगर येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीच्या 18 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता.30) पासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता.6) एप्रिल 2025 या रोजी या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने होणार आहे. सप्ताह यशस्वीतेसाठी श्रीराम सेवाभावी संस्था, श्रीराम मित्रमंडळ, अयोध्यानगर, बजाजनगर व पंचक्रोशीतील भाविक परिश्रम घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *