March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.1)- विटावा येथील एका तरुणाने अचानक ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत ग्रामपंचायतचा दरवाजा, संरक्षण भिंत व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. यात शासकीय मालमत्तेचे जवळजवळ 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी (ता.30) रोजी रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास विटावा ग्रामपंचायत येथे झाली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील विटावा ग्रामपंचायत मधील शिपाई गणेश अशोक जाधव हे शनिवारी (ता.30) रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतमध्ये फिल्टरचे पाणी वाटप करत होते. त्यावेळी विटावा गावातील अमोल कचरु गोळे (अंदाजे वय 25) वर्षे हा ग्रामपंचायत कंपाउंडजवळ आला. आणि जोरजोरात आरडाओरड करुन कंपाउंड वॉलचे बांधकाम पाडण्यास सुरवात केली. तसेच तेथे असलेल्या ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर दगड व गट्टू घालुन तोडण्यास सुरवात केली. यावेळी शिपाई गणेश जाधव याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना आई व बहिणीवर शिविगाळ करुन हाताचापटाने मारहाण केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात घुसुन कॅमेरे तोडले आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा मुख्य दरवाजावर लाथा व दगडाने तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाचे दोन कॅमेरे व संरक्षण भिंतीचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे व प्रशासक बी एन घुगे यांनी रविवारी (ता.31) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात येऊन पाहणी केली.

शासकीय मालमत्तेचे नुकसान –
यावेळी त्याने दगड मारून 25 हजार रुपये किमतीचे दोन सीसीटीव्ही कॅमेरे, लाथा मारून ग्रामपंचायत कार्यालयाचा 5 हजार रुपये किमतीचा दरवाजा, दगड, गट्टने मारुन 30 हजार रुपयाचे वॉल कंपाऊंड (संरक्षण भिंत) असे एकुण 60 हजार रुपयाचे शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –
याप्रकरणी विटावा ग्रामपंचायत अधिकारी रमेश कचरु मुळे (वय 49) रा. सिडको वाळूजमहानगर -1
यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल कचरु गोळे (वय 25) रा. विटावा याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *