March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.31) – अचानक आयशर ट्रक आडवी आल्याने कार चालकाने ब्रेक लावले आणि पाठीमागून येणारी बस कारवर धडकली. या विचित्र अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. हा अपघात शनिवारी (ता 29 )रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ए एस क्लब चौक येथे झाला.


या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, मयुर मोरे व त्याचे मित्र शनिवारी (ता 29) रोजी इरटिका कार (एम एच 12, व्ही एल -6281) मधून छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात होते. दरम्यान एएस क्लब चौकातील सिग्नल जवळ येताच समोरून आयशर ट्रक जात असतांना चालकाने ब्रेक दाबले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या बस (एमएच 26, बीई -4499) च्या चालकाने कारला जोराची धडक दिली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बस चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *