वाळूजमहानगर, (ता.31)- वाळूज परिसरातील नांदेडा येथे 50 वर्षीय इसमाने राहत्या घरी पत्र्याच्या छताला कापडी स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना शनिवारी (ता.29) रोजी दुपारी घडली. 
वाळुज परिसरातील नांदेडा (एकलहेरा) येथील गोकुळ आंबादास मते (वय 50) यांनी राहते घरी पत्र्याच्या छतास लोखंडी पाईपला कापडी स्कार्फच्या सहाय्याने शनिवारी (ता.29) रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास गळफास घेतला. यात ते बेशुद्ध झाल्याने त्यांना प्रवीण राजेंद्र मते यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. तेथे उपचार चालु असतांना गोकुळला दुपारी 3:10 वाजेच्या सुमारास तपासुन मयत घोषीत केले. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल एम डी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र गोकुळ मते यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव चौथे करीत आहे.
