March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.29) – खानावळीमध्ये दुपारचे जेवण झाल्यानंतर पायी घरी जाणाऱ्या 26 वर्षीय कामगाराला एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी मारहाण करत जखमी करून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख 4 हजार रुपये. असा एकूण 14 हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले. ही घटना बजाजनगर येथील जयभवानी चौक ते लक्ष्मीनगर दरम्यान बुधवारी (ता.26) रोजी भरदुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूच्या औद्योगिक वसाहतीतील अल्टामँनझिन कंपनीत हेल्पर म्हणुन काम करणारा गजानन नारायण काळे (वय 26) हा बजाजनगर येथील लक्ष्मीनगरात राहतो. बुधवारी (ता.26) रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तो जेवण करून जयभवानी चौकातून पायी घरी जात होता. त्याचवेळी पाठीमागुन अचानक एक काळ्या रंगाची स्कुटी ( एम एच 20, सी ई- 5091) वर 20 ते 22 वर्ष वयोगटातील 3 अनोळखी इसम आले. त्यातील पाठीमागे बसलेल्याने खाली उतरुन गजानन काळे यांच्या डोळ्यावर बुक्की मारली. व मध्यभागी बसलेल्याने दगड डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर त्याच्या जवळील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल व रोख 4 रुपये असा 14 हजार रुपये किर्तीचा ऐवज बळजबरीने हिष्कावून घेऊन पळून गेले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *