March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.27) – दारू पिण्याच्या सवयीच्या असलेल्या एका तरुणाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत विटकर मारून जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना जोगेश्वरी येथील गुलमोहर कॉलनीत सोमवारी (ता.24) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी गोरख खाजेकर (वय 30) व गोरख कल्याण खाजेकर हे नात्याने पत्नी व पती आहे. ते मुंजा मंदिर गुलमोहर कॉलनी जोगेश्वरी येथे राहतात. आरोपी गोरख खाजेकर हा दारु पिण्याचा सवईचा असुन त्याने पत्नी लक्ष्मी हीच्या चारित्र्यावर संशय घेवुन शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण केली. व बांधकामाची विटकर उचलुन डोक्यात मारुन जखमी केले. तसेच तु इथुन निघुन जा, परत इथे आली. तर जिवे मारीन अशी धमकी दिली. ही घटना सोमवारी (ता.24) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राहते घरी घडली. याप्रकरणी लक्ष्मी खाजेकर हिच्या फिर्यादीवरून आरोपी गोरख खाजेकर यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश मनोरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *