वाळूजमहानगर, (ता.26) -एका 11 वर्षीय मुलाचे काणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. ही घटना रविवारी (ता.23) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सहजापूर येथे घडली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहजापूर येथील अरशान हुसैनोदिर शेख (वय 11) हा बाहेर जाऊन येतो असे सांगून रविवारी (ता.23) रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घराबाहेर गेला. बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही. म्हणून त्याचा आजूबाजूला, नातेवाईकाकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याचे कोणतरी अज्ञात आरोपीने काहीतरी कारणासाठी अपहरण केले. या संशयावरून हुसैनोदिन मौनोदिन शेख यांनी फिर्याद दिल्याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
