March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.26) – बांधकाम सुरू असलेल्या घरात एका 42 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.25) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दुर्गा धामनी ता.जि. हिगोली येथील 42 वर्षीय पुष्पा संजु ठोके ही कुटुंबासह वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे राहुल मोल मजुरी करत होती. पुष्पाने राहत असलेल्या घराच्या बाजूला नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावरील आडव्या लाकडी फळीला दोरीच्या सह्याने तिने गळफास घेतला. मंगळवारी (ता. 25) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस येतात तिला बेशुध्द अवस्थेत कुटूंंबियानी घाटीत दाखल केले. उपचार सुरू असतांना डॉक्टरांनी 9 वाजेच्या सुमारास तीला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशव चौथे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *