
वाळूजमहानगर, (ता.26) – शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयाचे शिक्षक डॉ. बी जी गायकवाड यांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन अवार्ड नुकताच मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा यांच्या वतीने देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल एज्युकेशन आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल राजा शिवाजी विद्यालय, यशश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातून गायकवाड यांचे स्वागत होत आहे.
