March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.23) – गांजा खरेदी करून एसटी बसने प्रवास करून तो विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या एका आरोपीस पकडून त्याच्या ताब्यातून 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने वाळुज परिसरातील साउथ सिटीत केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज पोलीस ठाणे हद्दीत साऊथ सिटीजवळ आरोपी जिवन पदमसिंग महेर (वय 35) रा. तपोवन परिसर पळशी ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर हा गुंगीकारक गांजा (कॅनबीस वनस्पती) ची चोरटी विक्री करत असतांना त्यास शुक्रवारी (ता.21) रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास छापा मारुन पकडले. त्याच्या ताब्यातुन 1 किलो 584 ग्रॅम वजनाचा गांजा (कॅनबीस वनस्पती) तसेच गांजा सॅम्पल चे अनेक फोटो असलेला मोबाईल असा 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी जीवन महेर याने एस टी बसने प्रवास करून शिवाजी बसंत रा. रेलगाव ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर याच्याकडुन खरेदी केल्याचे सांगितले. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जीवन महेर व शिवाजी बसंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ प्रतिबंध शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोह लालाखान पठाण, पोअं सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, कल्याण निकम, मपोअं छाया लांडगे, शिल्पा तेलोरे यांच्या पथकाने केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *