वाळूजमहानगर, (ता.23) – दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीस लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या भांडणात आलेल्या पत्नीच्या भावाला सुद्धा वीट मारून जखमी केल्याची घटना गुरूवारी (ता.20) रोजी नांदेडा एकलहेरा येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिमा जाधव ही तीस वर्षीय विवाहिता रा.नांदेडा एकलहेरा येथे कुटूंबासह राहते. गुरूवारी (ता.20) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सिमा हिचा पती नवनाथ दशरथ जाधव हा घरी दारू पिऊ आला. त्यानंतर दारू पिण्यासाठी पत्नी सिमा हिला पैसे मागितले. मात्र पैसे देण्यास तीने देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पत्नीस शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी सिमा हिचा भाऊ अभिषेक आहिरे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता, त्याला सुद्धा शिवीगाळ करीत, विट डोक्यात मारून जखमी केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह कैलास वाघ करीत आहे.
