March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.23) – केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व वाळूज परिसरात असलेल्या रांजणगाव (शेणपुंजी) या गावाची मॉडेल ‘सौर’ गाव म्हणून राज्यात निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.21) रोजी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (ता.28) रोजी रांजणगाव (शेणपुंजी)त होणार आहे.

ग्रामीण भागात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी, गावकऱ्यांच्या स्वच्छ आणि वीज ग्राहकांचा आर्थिक खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) या गावाची मॉडेल ‘सौर’ गाव म्हणून राज्यातून प्रथम निवड करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.21) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, मुख्य मार्गदर्शक अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, लिड बँक मॅनेजर मंगेश केदार, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंगराव खंदारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता भूषण पोहरकर, गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवाई, सरपंच योगिता प्रभाकर महालकर, किरण धिरडे, आमदार प्रशांत बंब यांचे स्वीय सहाय्यक किशोर देशमुख, गोपाल वर्मा यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी होणार शुभारंभ –
या योजनेचा शुभारंभ जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत रांजणगाव (शेपू) यांच्या संयुक्त विद्यमाने
शुक्रवारी (ता.28) मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता रांजणगाव (शे.पू) येथे होणार आहे. ही योजना आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंचायत समिती सदस्य दिपक बडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
वीज ग्राहकांना आवाहन –
या योजनेच्या लाभासाठी व आपल्या घरावर सोलार पॅनल बसवून घेण्यासाठी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी. तसेच वीजबिलापासून मुक्ती मिळवून शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा फायदा घ्यावा. असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य दत्तु हिवाळे, अशोक जाधव, पंकज हिवाळे, दिपक सदावर्ते, संतोष लोहकरे, साईनाथ जाधव, कातां जाधव, जावेद शेख, बाबुराव हिवाळे, मोहिनाराज धनवटे, भीमराव किर्तीकर, नंदा बडे, निर्मला पठाडे, अश्विनी हिवाळे, सत्यशिला सुरुंग, संदिप मनोहरे यांनी कले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *