March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.23) – चारित्र्यावर संशय घेऊन ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये. असे म्हणत एका 26 वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला जिवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिल्या प्रकरणी पतीसह ननंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा, 26 वर्षीय सोनियाचे लग्न नरसिंगपूर ता. कन्नड येथील गौतम कडूबा धीवर याच्याबरोबर 2013 मध्ये झाले. त्यांना तीन मुली आहेत. लग्नानंतर सोनिया सासरी नांदावयास गेली असता, सुमारे वर्षभर तिला सासरच्या मंडळींनी व्यवस्थित वागवले. मात्र त्यानंतर ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये. असे म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. सोनियाचा पती गौतम हा दारूच्या आहारी गेला असून तो सतत सोनियावर संशय घेतो. 12 ऑक्टोबर 2024 रोजी सोनियाच्या चारित्र्यावर संशय घेऊन गौतम याने तिला जीवे मारण्याची धमकी देत रात्रभर लाथा बुक्क्याने मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी नणंद मंगल चव्हाण ही घरी आली. तीने गौतम यास एकाचे दोन सांगून आणखी भांडणे लावल्याने पुन्हा गौतम याने सोनियाला मारहाण केली. व तिन्ही मुलींसह घरातून हाकलून दिले. या प्रकरणी सोनिया गौतम धीवर या विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी पती गौतम कडूबा धीवर व ननंद मंगल सुभाष चव्हाण यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *