March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.22 – तुमच्या एखाद्या पोस्टमुळे चुकीचा मेसेज जाऊ शकतो. आणि सामाजिक शांतता भंग होऊन तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये. अशी पोस्ट टाकल्यास किंवा आढळल्यास ती टाकणाऱ्यासह एडमिन सुद्धा जबाबदार राहील. असा मार्गदर्शनपर इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.21) रोजी दिला.


नुकतीच झालेली नागपूर येथे दंगल, खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचा वाद, नाथषष्ठी, रमजान ईद, गुढीपाडवा, श्रीराम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने शुक्रवारी (ता.20) रोजी सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, उद्योजक अर्जुन आदमाने यांनीही समायोजित मार्गदर्शन करत सामाजिक शांतता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, भाग्यश्री शिंदे आदींसह उद्योजक अर्जुन आदमाने, जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रवीण दुबिले, घाणेगावचे सरपंच केशव गायके, पोलीस पाटील शाम फाळके, तिसगावचे सरपंच लालचंद कसुरे, वडगाव -बजाजनगरचे माजी सरपंच राजू शहाणे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, पंढरपूरचे माजी सरपंच हारुण चौधरी, उद्योजक नरेंद्र यादव, माजी उपसरपंच विष्णू जाधव, शहरप्रमुख विशाल खंडागळे, शरद कीर्तिकर, प्रकाश निकम, अवचित मोरे, सोमनाथ महापुरे, जाफर पटेल, तौफीक पटेल, अस्लम पटेल, अतुल दाभाडे पाटील, अनिता डहारीया यांच्यासह बजाजनगर, रांजणगाव (शेणपुंजी, जोगेश्वरी, तिसगाव, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, साजापूर, विटावा, घाणेगाव येथील विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, शैक्षणिक संस्थाचालक आदींची उपस्थिती होती. शांतता समितीच्या यशस्वीतेसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, योगेश शेळके, विक्रम वाघ आदींनी परिश्रम घेतले.

– धार्मिक सण उत्सव साजरा करताना व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा प्रसार माध्यमांवर सामाजिक सदभावने विषयीच पोस्ट टाका. एखाद्या धर्माविषयी किंवा सामाजिक शांतता भंग होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट करू नका. अशी पोस्ट टाकणाऱ्यावर तसेच ज्या ग्रुपवर ही पोस्ट आली. त्याच्या एडमिनवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल. सर्व धार्मिक सण, उत्सव एकोप्याने साजरे करा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *