March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.11) – सेवाभारती देवगिरी प्रांत जिल्हा वाळूजच्या वतीने वडगाव कोलाटी येथे चालू करण्यात आलेल्या किशोरी विकास प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच सुनील काळे, ग्रामपंचायत अधिकारी भीमराव भालेराव, मुलानी वाडगावचे ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांच्या हस्ते रविवारी (ता.9) करण्यात आले.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाभारती देवगिरी प्रांत जिल्हा वाळूजच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाअंतर्गत किशोरी मुलींना दैनंदिन भासणाऱ्या शारीरिक, सामाजिक समस्या, अडीअडचणी, शैक्षणिक धार्मिक विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले महिला समाज मंडळाच्या अध्यक्षा वंदना सुरडकर यांनी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले. वाळूज प्रांताचे अध्यक्ष रामदास लाहबर, सचिव श्रीकृष्ण होशिंग, अँड.नूतनताई पाटील आदी मान्यवरांचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाळूज जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, किशोरवयीन वर्गाच्या दैनंदिन मार्गदर्शिका योगिता नरोटे, आरती गव्हाणे, ज्योती सोळंके यांच्यासह वडगाव (को.) येथील आशा स्वयंसेविका व किशोरवयीन मुली आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे यांनी राज्य गीताने करून पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *